॥ श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रूपात ॥

27 05 2011

॥ जय श्रीराम ॥

                          आई गेल्यानंतर श्रीमहाराज आयोध्येहून इंदूर , नाशिक येथे मुक्काम करून गोंदवल्यास परतले. येव्हाना श्रीमहाराजांना गोंदवले सोडून एक वर्षांच्यावर काळ लोटला होता. गीताबाईंची आठवण सर्व गावाला होत होती.
सन १८९६ उजाडले पुन्हा दुष्काळ. परंतू पूर्वीच्या दुष्काळापेक्षा याची तीव्रता कमी होती. काशीहून परत आल्यावर लगेचच शेतीतील कामे काढून श्रीमहाराजांनी लोकांना खायला घातले मागील दुष्काळा प्रमाणॆ यावेळीही जे लोंक शेतात कामाला येत त्यांना एक वेळचे अन्न मोफत दिले जाई. तसेच मंदिरात रोज दहाहजार जप करणारास अन्न मोफत दिले जाई. याच काळात गाईंसाठी श्रीमहाराजांनी एक गोशाळा बांधली. Read the rest of this entry »

॥ आईची काशीयात्रा व निर्याण ॥

19 05 2011

॥ जय श्री राम ॥

श्रीमहाराज गेल्या नऊ- दहा वर्षांपासून गोंदवल्यातच स्थिर राहिले होते. त्यामूळे त्यांचा लोकसंग्रह फार वाढला होता. श्रीमहाराजांकडे त्यानिमित्ताने अनेक लहान मोठे लोक गोंदवल्यात येत. आपल्या मुलाला लोक इअतका मान देतात याचे श्रीमहाराजांच्या आईला गीताबाईंना फार कौतुक वाटे. याच काळांत श्रीमहाराजांना दोन मुलें झाली; परंतु ती दोन्ही लहानपणींच वारली.

       वयोमानामुळे गीताबाई आता थकल्या होत्या. श्रीमहाराजांनी आपल्या आईची फार मनापासून सेवा करीत. असेच एकदा श्रीमहाराजांनी आपल्या आईला तिची काही इच्छा असल्यास त्याबाबत विचारले. त्यावर आईने आता केवळ काशीयात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमहाराज यापूर्वी बरेच वेळा काशीस जाऊन आले होते पण एकटे व पायी यावेळेस मात्र श्रीमहाराज आपल्या आईला घेवून आगगाडीने काशीस जाण्याचे ठरवीले. त्याप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली.   शंभरच्या वर स्त्री व पुरूषांना घेवून श्रीमहाराज आपल्या आईला घेवून काशीस गेले. काशीला मसूरियादीन शिवमंगल नांवाचा एक ब्राह्मण श्रीमहाराजांचा पंडा होता. तो श्रीमहाराजांना गुरूस्थानी मानीत असे. त्यांने श्रीमहाराजांची व्यवस्था एका संस्थानिकाला शोभेल अशी ठेवली होती. श्रीमहाराज तेथें एक महिनाभर राहिले. आईला रोज स्वत: उचलून गंगास्नानासाठी श्रीमहाराज घेवून जात.या मुक्कामांत श्रीमहाराजांनी पाच सहस्त्रभोजने, तीन इच्छाभोजने, भिका-यांना पांच भोजने आणि तीन संन्याशी भोजने घातली. Read the rest of this entry »

॥ धाकट्या राम मंदिराची स्थापना ॥

1 09 2010

॥ जय श्री राम ॥

भिकाजी श्रीपत नांवाचे एक फौजदार होते. श्रीमहाराजांच्यावर त्यांची विशेष अशी निष्ठा होती. या भिकाजीपंताजवळ बत्ताशा नावाचा एक पांढरा शुभ्र, सुंदर पण थोडा मस्त असा घोडा होता. तो घोड भिकाजीपंतांनी श्रीमहाराजांना अर्पण केला. घोडा उमदा असला तरी अत्यंत खट्याळ होता. इतरांना तो अजीबात दाद देत नसे. उलट श्रीमहाराजांच्यावर त्याचे विलक्षण प्रेम असे. दर एक दोन दिवसांनी श्रीमहाराज त्याच्याजवळ जात, त्याच्याशी बोलत आणि पुष्कळवेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणत. बत्ताशा श्रीमहाराजां व्यतिरीक्त इतरांना त्याच्यावर अजीबात बसू देत नसे. शाहूराव चिवटे नांवाचे श्रीमहाराजांचे एक शिष्य, एक दिवस श्रीमहाराजांच्या दर्शनास आले. बत्ताशाला पाहून त्यांनी श्रीमहाराजांकडे बत्ताशाची मागणी केली. श्रीमहाराजांनी लगेचच बत्ताशा येत असल्यास, त्याला घेवून जाण्यास सांगीतले. श्रीमहाराजांनीच परवानगी दिल्यामूळे शाहूरावांनी बत्ताशास जबरदस्तीने घरी नेले. Read the rest of this entry »

॥ श्रीराम मंदिराची स्थापना ॥

7 06 2010

॥ जय श्री राम ॥

अगदी बालपणापासून श्रीमहाराजांची प्रभु श्रीरामावर नितांत श्रद्धा होती.श्रीरामचंद्राच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की, जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामचंद्राच्या इच्छेनेच घडते, असे अक्षरश: रात्रंदिवस ते घोकीत असत. लोकांसाठी उपासनेचे केंद्र आवश्यक असल्याने आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास आरंभ केला.
मंदिराच्या बांधकामासाठी गोंदवल्यातीलच गवंडी व सुतार यांची नेमणूक श्रीमहाराजांनी केली. मंदिराचा नकाशा त्यांनी स्वत: तयार केला. श्रीमहाराजांच्याकडॆ साठविलेले द्रव्य असे मुळीच नव्हते; आणि मंदिराच्या बांधकामासाठी श्रीमहाराजांनी कधीही, कोणाकडॆही पैशासाठी याचना केली नाही. दररोज श्रीमहाराजांच्या दर्शनास येणारे लोक आपण होऊन त्यांच्यासमोर जे द्रव्य ठेवीत त्याच्यावरच बांधकामाचा सर्व व्यवहार चालत असे. Read the rest of this entry »

॥ लोकसंग्रह ॥

27 05 2010

॥ जय श्री राम ॥

उज्जैनहून श्रीमहाराज इंदूरला वास्तव्यास आले. तेथील एक प्राध्यापक श्रीमहाराजांकडे नेहमी येत असे. तो जितका बुद्धिमान तितकाच अश्रद्ध होता, परंतू प्रामाणिकही होता. त्याचे व श्रीमहाराजांचे बराच काळ संभाषण चाले.त्यांत तो अनेक शंका,प्रश्न श्रीमहाराजांना विचारीत असे आणि श्रीमहाराज देखील त्याच्या सर्व प्रश्ननांना अत्यंत प्रसन्नपणे उत्तरे देत. एक दिवस तो म्हणाला, “महाराज, आपण न मागतां, लोक आपल्याला इतकी मेवा मिठाई आणि फळफळावळ कां देतात ? ” श्रीमहाराज हसून बोलले,” हा प्रारब्धाचा गुण आहे. आपले अन्न वस्त्र,पैसा,मान-अपमान व शरीर दु:ख या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत.” हे एकून तो गप्प बसला घरी गेल्यावर प्राध्यापकाने पुष्कळ विचार केला,परंतू प्रारब्धाचा हा सिद्धांत त्याला काही पटेना. दुस-या दिवशी श्रीमहाराजांकडे आल्यावर तो जरा बाजूला बसला. काहीं वेळानंतर श्रीमहाराजांच्या दर्शनास एक गृहस्थ आला व त्याने श्रीमहाराजां पुढे एक अत्तराची कुपी ठेवली. आणखी काही काळ गेल्यानंतर दुसरा गृहस्थ आला,त्याने श्रीमहाराजांकडे ती अत्तराची कुपी मागीतली श्रीमहाराजांनी त्याला ती देऊन टाकली.आणि प्राध्यापकाकडॆ बघून श्रीमहाराज म्हणाले,” प्रारब्ध असा खेळ करीत रहाते.” “तुम्ही नोकरी चाकरी करणार,घरदार संभाळून प्रपंचात रहणार,आणि आमच्यासारख्या गोसाव्यापुढे मिठाई येऊन पडते याचे वैषम्य वाटून घेणार ! जरासे धाडस कर, आणि मग पहा काय घडते तें! ” Read the rest of this entry »

॥ मरायची विद्या ॥

1 02 2010

॥ जय श्री राम ॥

दुसरे लग्न झाल्यानंतर श्रीमहाराज चार-पाच महिने गोंदवल्यासच राहिले. त्याच कालावधीमध्ये त्यांचा धाकटा भाऊ अण्णा व नंतर खातवळची बहिण मुक्ताबाई कालवश झाले. अगदी थोड्या काळामध्ये घरातील तीन चार माणसे मृत्युमुखीं पडल्यामुळे गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला.

पंतांच्या वारसांपैकी श्रीमहाराजच तेवढे राहिले होते. त्यांच्या वडिलोपार्जित पुष्कळ जमिनी गोंदवल्यास व काही इतर गांवी होत्या. एवढ्या जमिनींचे श्रीमहाराज एकटेच वारस राहिले हे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनी संदर्भात वाद निर्माण केला. परंतू श्रीमहाराज काही जमिनी सोडायला तयार होत नव्हते. प्रकरण प्रत्येक वेळी अगदी हांतघाईवर येत असे,भाऊबंद श्रीमहाराजांना शिव्या देत असत श्रीमहाराजदेखील त्या सव्याज परत करीत असत. सगळे संपल्यानंतर मात्र त्यांना चांदीच्या ताटामध्ये आपल्या बरोबर जेवावयास बसवित. एकदा असेच श्रीमहाराज ऒट्यावर बसले असताना घराच्या छतावरून महाराजांच्या एका भाऊबंदाने एक मोठा धोंडा श्रीमहाराजांच्या डोक्यात टाकला,परंतू श्रीमहाराज चटदिशी बाजूला सरकले. रात्री त्याच भाऊबंदाला जवळ घेऊन जेवायला बसले.

Read the rest of this entry »

॥ पत्नीचा मृत्यु व द्वितीय विवाह ॥

28 07 2009

nnam6

॥ जय श्री राम ॥

आयोध्येहून परतल्यावर श्रीमहाराजांनी गोंदवल्यास काही काळ राहण्याचे ठरविले. सन १८७६ -७७ या साली श्रीमहाराज गोंदवले सोडून कोठेही बाहेर गेले नाहीत. याच सुमारास संपूर्ण हिंदुस्थानात सर्वत्र दुष्काळ पडला होता. त्यावेळी ब्रिटीश सरकारने थोडी फार दुष्काळी कामे सुरु केली. तरीही लोकांची उपासमार थांबेना तेंव्हा श्रीमहाराजांनी गोंदवल्यास आपल्या शेतामध्ये दुष्काळी काम सुरु केले. जवळजवळ दिडशे बैलगाड्या कामावर लागल्या. कामाच्या मोबदल्यात प्रत्येक माणसाला एक भाकरी व एक भांडे भरुन आमटी  श्रीमहाराज स्वत: देत. गोंदवल्यातील माणसांबरोबर शेजारील गावातील लोकही कामावर येवू लागले. रोज सुमारें दिडहजार मनुष्य जेवून तृप्त होऊन जात.

तो पारतंत्र्याच काळ होता. ब्रिटिशांच्या विरुध्द बंड पुकारणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आपल्या कार्यास सत्पुरुषांचा आशीर्वाद मिळावा म्हणून अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांकडे, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीमाणिकप्रभु यांचे कडे जावून आले.परंतू कोणीही त्यांच्या कार्यास सहमती दर्शविली नाही. बंडाची सर्व तयारी झाल्या नंतर ते श्रीमहाराजांना भेटावयास गोंदवल्यास आले. श्रीमहाराजांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही. अजून अनुकुल काळ आला नाही. शक्ति वाया न घालता भगवंताची उपासना करण्याबद्दल सांगूनही वासूदेव बळवंत फडके काहीही न ऎकता तडक पुण्यास निघून गेले.पुढे थोड्याच दिवसात सन १८७९ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने त्यांना पकडले. त्या नंतर सन १८८३ साली त्या थोर आद्य क्रांतिकारकाचे एडनच्या तुरुंगात प्राणोत्क्रम झाले. Read the rest of this entry »