॥ जय श्री राम ॥
दुसरे लग्न झाल्यानंतर श्रीमहाराज चार-पाच महिने गोंदवल्यासच राहिले. त्याच कालावधीमध्ये त्यांचा धाकटा भाऊ अण्णा व नंतर खातवळची बहिण मुक्ताबाई कालवश झाले. अगदी थोड्या काळामध्ये घरातील तीन चार माणसे मृत्युमुखीं पडल्यामुळे गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला.
पंतांच्या वारसांपैकी श्रीमहाराजच तेवढे राहिले होते. त्यांच्या वडिलोपार्जित पुष्कळ जमिनी गोंदवल्यास व काही इतर गांवी होत्या. एवढ्या जमिनींचे श्रीमहाराज एकटेच वारस राहिले हे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनी संदर्भात वाद निर्माण केला. परंतू श्रीमहाराज काही जमिनी सोडायला तयार होत नव्हते. प्रकरण प्रत्येक वेळी अगदी हांतघाईवर येत असे,भाऊबंद श्रीमहाराजांना शिव्या देत असत श्रीमहाराजदेखील त्या सव्याज परत करीत असत. सगळे संपल्यानंतर मात्र त्यांना चांदीच्या ताटामध्ये आपल्या बरोबर जेवावयास बसवित. एकदा असेच श्रीमहाराज ऒट्यावर बसले असताना घराच्या छतावरून महाराजांच्या एका भाऊबंदाने एक मोठा धोंडा श्रीमहाराजांच्या डोक्यात टाकला,परंतू श्रीमहाराज चटदिशी बाजूला सरकले. रात्री त्याच भाऊबंदाला जवळ घेऊन जेवायला बसले.
वरील घटनेची हकिकत गीताबाईंना समजल्यावर त्यांनी प्रथम श्रीमहाराजांची दृष्ट काढली.त्या फार चितांक्रांत झाल्या त्यावर श्रीमहाराजांनी त्यांची समजूत काढत त्यांना मरायची विद्या येत असल्या बद्दल सांगितले . यानंतर थोड्या दिवसानंतर एके रात्री श्रीमहाराजांचे अचानक पोट दुखु लागले. अपचनाने पोट दुखत असेल म्हणून गीताबाईंनी श्रीमहाराजांना ऒवा खाण्यास दिला पण पोटदुखी काही केल्या कमी होईना. श्रीमहाराजांचे पोटदेखील हळूहळू फुगायला लागले. मग मात्र आईने गावातीलच वैद्याला बालावून आणले वैद्याने नाडी तपासून मात्रा दिली परंतू काहीच उपयोग होईना. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास श्रीमहाराजांची नाडी लागेना, श्रीमहाराज प्रेतवत पडून राहिले. गीताबाई मोठ मोठ्याने रडू लागल्या. तासाभराने सभोवतीच्या मंडळींनी पुढच्या तयारीला सुरूवात केली.तेंव्हा श्रीमहाराजांनी हलचाल करावयास सुरूवात केली काहीवेळाने शरीरांत प्राण आला. श्रीमहाराज उठून बसले व आईला म्हणाले “मरायची विद्या कशी असते हे तुला दाखवायचे होते “
याप्रसंगानंतर श्रीमहाराज पुन्हा गोंदवले सोडून कार्तिकी एकादशी साठी पंढरपूरास गेले. तेथून पुढे सदुभाऊ लेले यांचेकडे अलिबागला काही दिवस थांबले. त्यानंतर ते उत्तरेकडॆ जाण्यास निघाले. श्रीमहाराज उत्तरेकडे नर्मदेच्या किना-यावरून जाताना एके दिवशी महेश्वर नावांच्या गावी मुक्कामास थांबले. याच गांवात दोन मोठे मांत्रिक रहात होते. श्रीमहाराजांचे तेज पाहून हे कोणीतरी मोठे मंत्र तंत्र सिद्धिचे जाणकार आहेत असा त्या दोघांचा समज झाला. ते श्रीमहाराजांच्या कडे मंत्रविद्या शिकवण्यासाठी आग्रह धरू लागले. श्रीमहाजांनी त्यांना सांगितले ” अरे ! मला मंत्र तंत्र काही जाणत नाही. मी फक्त एक राम नाम जाणतो.मी तर त्या रामाचा एक दीन दास आहे ” श्रीमहाराज काही केल्या आपल्याला मंत्र तंत्र शिकवेनात हे पाहून त्या दोघा मांत्रिकांनी श्रीमहाराजांवर नागपाश टाकला. त्याक्षणी श्रीमहाराजांच्या अवतीभवती मोठमोठे नाग फूत्कार टाकत उत्पन्न झाले व थोड्याच अवधीत त्यांनी श्रीमहाराजांना विळखा टाकला. श्रीमहाराजांनी त्या दोघांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते एकेनांत अखेर तीन दिवसांनी त्या अवस्थेत श्रीमहाराजांनी “जय जय रघुवीर समर्थ ” म्हणत डॊंगरवरून उडी मारली त्याबरोबर सर्व नाग मरून पडले व श्रीमहाराज नागपाशातून मुक्त झाले. तीन दिवस नागपाश सोसणारा हा पुरूष सामान्य प्रतीचा नाही अशी त्या दोघांची खात्री झाली व ते श्रीमहाराजांना शरण गेले. श्रीमहाराजांनी त्यांना क्षमा करून रामनाम दिले.
तेथून श्रीमहाराज उज्जैनला गेले. श्रीमहाराज उज्जैनला आल्याचे कळतांच श्रीमहाराजांची पूर्वपरिचित सर्व मंडळी जमा झाली. ते जिथे उतरले होते तिथे मग भजन, किर्तन, वेदान्त श्रवण व अन्नदानास सुरूवात झाली. रोज अन्नदान होऊ लागले. तेथील मंडळींना श्रीमहाराजां बद्दल अतीव आदर व प्रेम असल्यामूळे रोज कोणी ना कॊणी त्यांना घरी बोलावीत असे. श्रीमहाराज देखील सर्वांना घेवून तिथे जात असत.
// श्रीराम समर्थ //


महाराजांचा ह्या जन्मीचा परिचय नाही पण आपले लिखाण आम्हांला वाचविते आणि आम्ही ते वाचतो…
बाकी निर्व्याज प्रेमे वजा गृहीत धरता मुद्दल खणखणीत वाजते ऐसा आजवरचा अनुभव आहे…
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!